नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो!
जमिनीचा व्यवहार करताना, शेताची वाटणी करताना किंवा नवीन प्लॉट विकत घेताना आपल्यासमोर सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे 'जमीन मोजणी' (Land Measurement). आपली जमीन नेमकी किती गुंठे, किती एकर किंवा किती चौरस फूट आहे, हे काढण्यासाठी अनेकदा आपल्याला इंजिनियर किंवा तलाठी कार्यालयात चकरा माराव्या लागतात. मोजणी करणाऱ्यांचे शुल्कही खूप जास्त असते. पण आता तुम्हाला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही!
डिजिटल युगात शेतीची आणि प्लॉटची मोजणी करणे अत्यंत सोपे झाले आहे. 'आपला मित्र' (AaplaMitra.in) तुमच्यासाठी घेऊन आला आहे एक अत्यंत प्रगत, मोफत आणि १००% अचूक जमीन मोजणी कॅल्क्युलेटर (Jamin Mojni Calculator). या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत की मोबाईलवरून घरबसल्या जमिनीची मोजणी कशी करावी आणि जमिनीच्या मापांची नेमकी पद्धत काय आहे.
शेतीचे किंवा कोणत्याही रिकाम्या प्लॉटचे आकार कधीच तंतोतंत चौरस (Square) नसतात. कधी शेताचा बांध वाकडा असतो, तर कधी जमीन त्रिकोणी किंवा अंडाकृती असते. अश्या चार असमान बाजू असलेल्या जमिनीचे क्षेत्रफळ काढणे सामान्य माणसाला कठीण जाते. चुकीच्या मोजणीमुळे खरेदी-विक्रीच्या व्यवहारात लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते.
अशा वेळी Online Calculator ची मदत घेतल्यास मानवी चुका टळतात. तुम्ही केवळ टेपने मोजलेली फूट (Feet) मधील मापे या कॅल्क्युलेटरमध्ये टाकून काही सेकंदात निकाल मिळवू शकता.
कोणत्याही ॲपशिवाय, मोफत आणि अगदी सोप्या पद्धतीने आताच तुमची जमीन मोजा.
👉 आताच जमीन मोजणी कॅल्क्युलेटर वापरा